top of page

दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राने पाच सुवर्ण दोन रौप्य व तीन कांस्यपदके पटकवली
राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धाजयपूर येथे सुरू असलेल्या त्र्याहत्तराव्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देणारे सायकलपटू मागील रांगेत डावीकडून ओम करांडे,अदिती डोंगरे, सुशीकला आगाशे, वेदांत जाधव आणि आकांक्षा म्हेत्रे. पुढील ओळीत डावीकडून सिद्धेश पाटील महेर पटेल आणि साहिल शेट्ये.

जयपूरच्या (राजस्थान) येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर सुरू असलेल्या 73व्या सीनियर, 50व्या ज्यूनियर आणि 36 व्या सब ज्युनियर राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या सायकलपट्टूनी आपला दबदबा कायम राखत स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कास्य पदके पटकावली.

वुमन एलिट गटात महाराष्ट्राच्या आदिती डोंगरे, कर्णधार सुशीकला आगाशे आणि मयुरी लुटे या सायकलपटूनी टीम स्प्रिंट प्रकारात 1 मिनिटं 14.470 सेकंद वेळ नोंदवताना सुवर्णपदक पटकावले या प्रकारात अंदमान-निकोबार संघाने 1 मिनिटं 19.595 सेकंदांची वेळ देत रौप्यपदक मिळवले, आसाम संघाने या प्रकारात कांस्यपदक मिळवले.


वुमन एलिट गटाच्या 10 कि मी स्क्रॅच रेस प्रकारात महाराष्ट्राच्या सुशीकला आगाशे हिने अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत रेल्वेच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंवर मात करताना 17 मिनिटे 49.510 सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले तर रेल्वेच्या सोनाली चानू हिने 17 मिनिटं 49.510 सेकंदाची वेळ देत रौप्य तर रेल्वेच्याच तोंगब्राम हिने 17 मिनिटे 49.893 वेळेसह कांस्यपदक मिळवले.


मुलांच्या सबज्युनियर वयोगटात पाचशे मीटर टाईम ट्रायल प्रकारात अत्यंत चुरशीच्या लढतीत महाराष्ट्राच्या वेदांत जाधव याने 35.994 सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले या प्रकारात मणिपूरच्या मौन लंबा याने 36.388 सेकंद वेळ देत रोप्यपदक तर महाराष्ट्राच्याच साहिल शेट्टीने 36.415 सेकंदांची वेळ देत कांस्यपदक मिळवले.


या स्पर्धेतील आजच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राला चौथे सुवर्णपदक ओमकार कारंडे याने मिळवून दिले. त्याने 10 मिनिटं 31.115 सेकंदांची वेळ नोंदवत सब जूनियर बॉईज गटातील 7 किलोमीटर स्क्रॅच रेस प्रकारात सुवर्णपदक पटकावले. या प्रकारात केरळच्या अथर्व पाटील याने 10 मिनिटं 31.253 सेकंदाची वेळ देत रौप्य पदक आणि आंध्रप्रदेशच्या के सुरेश बाबु याने 20 मिनिटं 31.552 सेकंदांची वेळ नोंदवत कांस्यपदक मिळवले.


आकांक्षी म्हात्रे हिने महाराष्ट्राला आजचे पाचवे सुवर्णपदक मिळवून दिले. युथ गर्ल्स गटातील पाचशे मीटर टाईम ट्रायल प्रकारात आकांक्षाने 42.451 सेकंदांची वेळ नोंदवताना सुवर्णपदक पटकावले, या प्रकारात मणिपूरच्या तोकचमने 43.291 सेकंद वेळेसही रौप्य आणि झारखंडच्या सबिना कुमारी हिने कांस्य पदक मिळाले.


युथ बॉईज वयोगटातील 2 किलोमीटर इंडिव्हिज्युअल परस्यूट प्रकारात महाराष्ट्राच्या सिद्धेश घोरपडे यांने 2 मिनिटं 48.025 सेकंदांची वेळ नोंदवताना रौप्यपदक मिळवले या प्रकारात हरियाणाच्या मयांक आणि 2 मिनिटे 46.563 वेळ देत रौप्यपदक आणि राजस्थानच्या सिताराम याने 2 मिनिटं 48.890 सेकंद वेळ नोंदवत कांस्यपदक मिळवले.


युथ गर्ल्स गटात 2 किलोमीटर इंडीविज्युअल परसुट प्रकारात महाराष्ट्राच्या आकांक्षा म्हात्रेने 3 मिनिटं 05.839 सेकंदाची वेळ नोंदवत रौप्यपदक मिळवले तर महाराष्ट्राच्या महेर पटेल हिने 3 मिनिटं 06.626 सेकंदाची वेळ नोंदवत कास्य पदक मिळवले.


मेन ज्युनियर वयोगटात 7 किलोमीटर्स स्क्रॅच रेसमध्ये महाराष्ट्राच्या सिद्धेश पाटील याने 10 मिनिटं 19.653 सेकंद वेळ देत कास्य पदक मिळवले तर महाराष्ट्राच्या आदिती डोंगरे हिने 6 मिनिटं 46.297 सेकंदाची वेळ नोंदवत वुमन जूनियर गटाच्या 4 किलोमीटर स्क्रॅच रेस प्रकारात महाराष्ट्राला कांस्यपदक मिळवून दिले.


Комментарии


bottom of page