top of page

पूजा दानोले, प्रणिता सोमणला सुवर्ण - २६वी राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा
हरयाणा येथे सुरु असलेल्या २६ व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राची सुवर्णकन्या प्रणिता सोमण आणि पूजा दानोले यांनी आपापल्या गटात सर्वोत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.

कुरुक्षेत्र येथे सुरु असलेल्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी वुमन ईलीट (महिला) गटात ३० किमी इंडीव्युजल टाईम ट्रायल (30 KM Ind. Time Trial) प्रकारात ४५ मि २२.१७६ से. वेळ देत प्रणिता सोमण हिने सुवर्णपदाकवर आपले नांव कोरले आणि रेल्वे व राजस्थानच्या मात्तबर सायकपट्टूंना मागे टाकले. या प्रकारात रलेल्वेची मेघा गुगड (Megha Gugad) हिने ४५ मि ४३.५५७ से. वेळ देत रौप्य तर राजस्थानच्या मोनिका जाट (Monika Jaat) ने ४६ मि ४०.७९७ से. वेळ देत कांस्यपदक पटकावले.

आळंदी, पुणे येथे २९ ते ३१ ऑक्टोबर २०२१ दरम्यान झालेल्या १८ व्या राष्ट्रीय एमटीबी अजिंक्यपद स्पर्धेत प्रणिताने तीन सुवर्णपदक पटकावताना स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट महिला सायकलपट्टूचा मान मिळवला आहे.
वुमेन ज्यनिअर (Women Junior) वयोगटात महाराष्ट्राच्या पूजा दानोले (Pooja Danole) हिने अपेक्षेप्रमाणे या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अकॅडमीमध्ये सराव करणा-या पूजाने २० किमी इंडिव्युजल टाईम ट्रायल (20 km Ind. Time Trial) प्रकारात २८ मि ११.४०४ से. वेळ नोंदवताना सुवर्णपदक मिळवले. पंजाबच्या जस्मिक कौर सेखॉन (Jasmeek Kaur Sekhon) हिने २८ मि ५५.५९९ से. वेळेसह रौप्यपदक तर कर्नाटकच्या चैत्रा बोरजी (Chaitra Borji) हिने २९ मि ३२.६२१ से. वेळेसह कांस्यपदक मिळवले.

या स्पर्धेच्या दुस-या दिवशी सर्व साघीक स्पर्धा होणार आहेत.Day 1 Results of Women Junior ITT

1st🏅 Pooja Danole from Maharashtra

2nd 🥈 @meeksekhon from Punjab

3rd 🥉Chaitra Borji From karnataka


Women Elite ITT

1st🏅@pranita_soman from Maharashtra

2nd🥈 @megha_cyclist from Indian Railways

3rd Monika jaat from Rajasthan


Cycling Association of Maharashtra (CAM) is a pioneer in the promotion of cycling sports in Maharashtra affiliated to the Maharashtra Olympic Association (MOA) , Cycling Federation of India.

Comments


bottom of page