PRATIK BAGS GOLD; TEAM MAHARASHTRA FINISHES RUNNERS UP IN OVERALL CHAMPIONSHIPS
कुरुक्षेत्र (हरयाणा) येथे संपलेल्या २६ व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या सायकलपट्टूंनी नेत्रदिपक कामगिरी करत ५ सुवर्ण, ३ रौप्य आणि २ कांस्यपदक पटकावताना स्पर्धेचे सर्वसाधारण उपविजेतेपद मिळवले. या यशात महाराष्ट्राचे प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय सायकलपट्टू राजेंद्र सोनी, बिरु भोजने व पांडुरंग भोजने यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण खेळाडूंना फायद्याचे ठरले. राजस्थानच्या संघाने या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद मिळवताना ७ सुवर्ण, ४ रौप्य आणि ४ कांस्य पदकांची कमाई केली.
आज झालेल्या मेन अंडर २३ वयोगटातील मास स्टार्ट स्पर्धेत कोल्हापूरचा असलेल्या महाराष्ट्रच्या प्रतिक पाटील याने अत्यंत चुरशीच्या झालेल्या १२० किमी. मास स्टार्ट (120 km Mass Start- Men Under 23) या प्रकारात २ ता. ४८ मि. ०९.४५९ से. वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. या प्रकारात कर्नाटकच्या अनिल कलाप्पागोलने (Anil Kalappagol) रौप्यपदक (२ ता. ४८ मि. ०९.३५ से.) तर कर्नाटकच्याच श्रीशैल वीरपूर (Shrishail Veerapur) याने कांस्यपदक (२ ता. ४८ मि. १०.२५२ से.) मिळवले.
मेन ज्युनिअर वयोगटात महाराष्ट्रच्या पुणे क्रीडा प्रबोधिनीच्या सिद्धेश पाटील याने १२० किमी मास स्टार्ट (120 km Mass Starat – Men Junior) वयोगटात अत्यंत अटीतटीने झालेल्या स्पर्धेत कांस्यपदक मिळवले. सिद्धशनने २ ता. ५३ मि. २०.९३५ से. वेळ नोंदवली. या प्रकारात परम राम (२ ता. ५३ मि. २०.४४६ से.) आणि मुकेश कुमार (२ ता. ५३ मि. २०.६७५से.) या राजस्थानच्या जोडीने अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक पटकावले.
महिलांच्या (Women Elite) ३० किमी क्रायटेरीयम या प्रकारात महाराष्ट्राच्या पूजा दानोले हिने १२ गुणांसह कांस्य पदक घेतले कर रेल्वेच्या एम. सोनाली चानू (२६गुण) आणि टी. मनोरमा देवी (१७गुण) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेत प्रत्येकी ३ सुवर्णपदके पटकावणारे सेनादलाचा साहील कुमार आणि राजस्थानच्या परमा राम स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पुरुष सायकलपट्टू आणि महिलांमध्ये ३ सुवर्णपदके मिळवणारी रेल्वेची सोनाली चानू सर्वोत्कृष्ट सायकलपट्टू ठरले.
Cycling Association of Maharashtra (CAM) is a pioneer in the promotion of cycling sports in Maharashtra affiliated to the Maharashtra Olympic Association (MOA) , Cycling Federation of India.
Comments