top of page

स्नेहल माळीला सुवर्ण;ओम कारंडे, अपर्णा गोरेला रौप्य - २६वी राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा

हरयाणा येथे सुरु असलेल्या २६ व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या सायकलपट्टूंनी नेत्रदिपक कामगिरी करत दोन सुवर्ण व तीन रौप्यपदके पटकावताना राजस्थानच्या सायकलपट्टूंना जोरदार शह देत आजचा दिवस गाजवला.

मुलींच्या सब ज्युनीअर गर्ल्स (Sub Junior Girls) गटात खारघर, नवी मुंबई येथील स्नेहल माळी हिने २० किमी मास स्टार्ट (20 km Mass Start- Sub Jr. Girls) प्रकारात अटीतटीच्या शर्यतिमध्ये ५६ मि. ०१.१२३ से. वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले, महाराष्ट्राचीच अहमदनगरची अपूर्वा गोरे हिने रौप्य तर बिहारच्या सुहानी कुमारी हिने कांस्य पदक मिळवले.

मुलांच्या सब ज्युनिअर गटात अहमदनगरच्या ओम कारंडे याने ३० किमी मास स्टार्ट (30 km Mass Start- Sub Jr. Boys) गटात रौप्यपदक (५६ मि. ०१.१२३ से.) मिळवले. या गटात गुजरातच्या केदार पटेल याने सुवर्ण तर केरळच्या अथर्व पाटील याने कांस्य पदक मिळवले.


युथ गर्ल्स वयोगटात महाराष्ट्राच्य मेहेर पटेल, श्रावणी परीट आणि आकांक्षा म्हेत्रे यांनी १५ किमी टीम टायम ट्रायल या सांघीक प्रकारात २४ मि. १३.२४० से. वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले, या प्रकारात हरायाणा संघाने रौप्यपदक (२४ मि. ३६.९१२ से.) आणि कर्नाटक संघाने कांस्यपदक (२५ मि. १४.१७८ से.) मिळवले.वुमन ज्युनिअर वयोगटात महाराष्ट्राच्य पूजा दानोले, आदिती डोंगरे, संध्या कोकाटे आणि मनाली रत्नोजी यांनी ३० किमी टीम टायम ट्रायल या सांघीक प्रकारात ४७ मि. ४७.१८३ से. वेळ नोंदवत रौप्यपदक मिळवले, या प्रकारात कर्माटक संघाने सुवर्णपदक (४६ मि. ४४.५७९ से.) आणि राजस्थान संघाने कांस्यपदक (४८ मि. २८.०९१ से.) मिळवले.


या स्पर्धेत ४ सुवर्ण व तीन रौप्यपदाकंसह महाराष्ट्र संघ दुस-या क्रमांकावर असून ६ सुवर्ण ३ रौप्य व ४ कांस्यपदकांसह राजस्थान प्रथम क्रमांकावर आहे.


Cycling Association of Maharashtra (CAM) is a pioneer in the promotion of cycling sports in Maharashtra affiliated to the Maharashtra Olympic Association (MOA) , Cycling Federation of India.


コメント


bottom of page