top of page
  • Black Facebook Icon

महाराष्ट्राचे सहा खेळाडू सोमण, गायकवाड, शिर्के,रत्नोजी,माळी, घरड भारतीय संघात

माऊंटन बाईक सायकलिंग ‘एशियन’ अजिंक्यपद स्पर्धा


पोनमुडी हिल्स्, थिरुवअनंतपुरम, केरळ येथे २६ ते २९ ऑक्टोबर २०२३ दरम्यान होत असलेल्या २८व्या ‘एशियन माऊंटन बाईक’ सायकलिंग अजिंक्यपद आणि १४ व्या ‘एशियन ज्युनिअर माऊंटन बाईक’ सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणा-या भारतीय संघात महाराष्ट्राच्या प्रणिता सोमण (संगमनेर), ऋतिका गायकवाड (नाशीक), सिद्धि शिर्के (पिंपरी चिंचवड), मनाली रत्नोजी (पुणे), विरेंद्र माळी (पुणे) आणि अभिजीत घरड (औरंगाबाद) यांची भारतीय संघात निवड झाली आहे. माऊंटन बाईक सायकलच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या सहा खेळाडूंची प्रथमच निवड होत आहे.

प्रणिता सोमणने २०१९ साली नेपाळ येथे झालेल्या साऊथ एशियन गेम्स् मध्ये भारताचे प्रतिनीधीत्व करताना एक कांस्य पदक पटकावले आहे तर २०२० साली थायलंड आणि २०२२ साली साऊथ कोरीआ येथे झालेल्या एशियन माऊंटन बाईक अजिंक्यपद स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनीधीत्व केले आहे.

स्पर्धात्मक सायकलिंगची माहिती नसलेल्या संगमनेर सारख्या ग्रामीण भागामधून आलेल्या प्रणिताने बोर्डामध्ये १० वीला ९७% आणि १२ वीला ९०% गुण मिळवले असतानाही सायकलिंग आपले करीअर म्हणून निवडले आणि व्यवसायाने डॉक्टर असलेल्या डॉ. प्रफुल सोमण यांनी आपल्या लेकीच्या निर्णयला पूर्ण पाठिंबा व सहकार्य दिले. अहमदनगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयामधून ८०% गुणांसह बी कॉम झाल्यानंतर तेथेच ती एम कॉम चे शिक्षण घेत आहे. प्रणिता सोमणने राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनीधीत्व करताना १८ सुवर्ण ७ रौप्य आणि ६ कांस्य अशी एकूण ३१ पदके पटकावण्याचा विक्रम केला आहे. प्रणिता तिच्या क्रीडा प्राकारत आजही भारतामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्र शासनाने क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जाणारा सन २०१९-२० सालच्या श्री शिवछत्रपती राज्य पुरस्काराने प्रणिताला सन्मानित केले आहे.

सप्टेंबर २०२३ मध्ये हँगझाऊ, (चीन) येथे झालेल्या एशियन गेम्स् साठी एमटीबी प्रकारात महाराष्ट्राची प्रणीता सोमण आणि ऋतिका गायकवाड यांची निवड झाली होती पण केंद्र सरकारने एमटीबी संघास आयत्यावेळी परवानगी नाकारल्याने या स्पर्धेस त्यांना जाता आले नाही.

 
 
 

1 comentário


Suman Yadav
Suman Yadav
07 de nov. de 2024

My dream is to become cyclist I have a cyclist cycle also I am 14 years old

Curtir
bottom of page