दिनांक: २२ फेब्रुवारी २०२४

नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या ४३व्या सिनीअर आणि ३०व्या ज्युनिअर आशियाई ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या झायना मोहंमद अली पिरखान हिने सुवर्णपदक आणि साहिल संतोष शेटे याने रौप्यपदक पटाकावले.
ज्युनिअर मुलींच्या वयोगटात टीम स्प्रिंट प्रकारात झायना मोहंमद अली पिरखान, सेबास्टिन निया, कुमारी सविता आणि कुमारी सबिता चा समावेश असलेल्या भारतीय संघाने सुवर्ण पदक पटकावले.
ज्युनिअर मुलांच्या वयोगटात साहिल संतोष शेटे, भागी सयद खालिद, मितेल वत्ताबा आणि माचतो नारायण चा समावेश असलेल्या भारतीय संघाने ४७.९३६ सेकंद वेळ नोंदवताना रौप्यपदक मिळवले.
साहील शेटे आणि झायना पिरखान यांच्या पदकविजेत्या कामगिरीबद्दल भारतीय सायकलिंग महासंघाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, सायकलिंग असोसिएश ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष अड विक्रम रोठे, सचिव प्रा. संजय साठे, खजिनदार भिकन अंबे, यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Comments