top of page

Maharashtra dominates with 11 golds to win overall national track cycling championships

राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा

महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व; 11 सुवर्णपदकांसह सर्वसाधारण विजेते

सी एफ आय चे चेअरमन श्री ओंकार सिंग, श्री सीपी जोशी, महासचिव मनिंदर पाल सिंह, खजिनदार प्रताप जाधव, डायरेक्टर व्ही एन सिंग, प्रशिक्षक दिपाली पाटील, दिपाली शिळधनकर, दर्शन बारगुजे आणि स्वप्निल माने यांच्यासह 73 व्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेचे 11 सुवर्ण 6 रौप्य व 6 कांस्यपदके मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पटकावणारा महाराष्ट्राचा संघ.


जयपूर (राजस्थान) येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर संपन्न झालेल्या 73व्या सीनियर, 50व्या ज्यूनियर आणि 36 व्या सब ज्युनियर राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी तीन सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावले आणि महाराष्ट्राला पदक तालिकेत सर्वोच्च स्थानी नेऊन ठेवले. अंदमान निकोबार, मनिपुर, रेल्वे, सेनादल यासारख्या आंतरराष्ट्रीय सायकल पट्टूनचा भरणा असलेल्या संघांना पिछाडीवर टाकत महाराष्ट्राने या स्पर्धेत 11 सुवर्ण 6 रौप्य आणि 6 कांस्यपदके पटकावत स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.


आज शेवटच्या दिवशी झालेल्या वुमन ईलिट गटात स्प्रिंट प्रकारात महाराष्ट्राच्या मयुरी लुट हिने अंदमान निकोबार चे आंतरराष्ट्रीय सायकलपट्टू दिबोरा हिला मागे टाकत 12.636 सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले आणि वूमन इलिट गटातील महिलांचे सर्वसाधारण विजेतेपद निश्‍चित केले. दिबोराने 13.236 सेकंद वेळ नोंदवत रौप्यपदक मिळवले तर ओडिशाच्या स्वाती सिंगने 14.102 सेकंद वेळ देत कांस्यपदक मिळावले.


आज महाराष्ट्राला दुसरे सुवर्णपदक मयुरी लुटेनेच मिळवून दिले, वूमेन इलीटमध्ये केरीन प्रकारात मयूर लुटे हिने रेल्वेची आंतरराष्ट्रीय सायकलपटू एम. सोनाली चानू हिच्यावर मात केली. सोनालीने रौप्यपदक तर अंदमान निकोबार च्या देवराणीने कांस्यपदक मिळवले.



महाराष्ट्राच्या संज्ञा कोकाटेने वुमेन ज्युनियर गटात स्प्रिंट प्रकारात 13.397 सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले तर महाराष्ट्राच्या श्वेता गुंजाळ हिणे 13.959 सेकंदाची वेळ नोंदवत रौप्यपदक मिळवले पंजाब ची अनुरीत गोरिया 14.439 सेकंदाची वेळ देत कांस्यपदक मिळवले.


सब ज्युनिअर गटात 35 गुणांसह महाराष्ट्राने या गटाचे विजेतेपद पटकावले तर राजस्थान 22 गुणांसह या वयोगटात दुसऱ्या क्रमांकावर राहिले. वुमन इलीट वयोगटात अटीतटीच्या झालेल्या स्पर्धेत 29 गुणांसह महाराष्ट्र विजेता ठरला तर आंतरराष्ट्रीय सायकलपटूनचा भरणा असलेल्या रेल्वेला 27 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.


महाराष्ट्राने 73 व्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत 98 गुणांसह स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. 68 गुणांसह मनिपुरने या स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवले. मनिपुर ने या स्पर्धेत एकूण 7 सुवर्ण 8 रौप्य आणि 3 कांस्य पदके मिळवली.


तीन सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावणारी महाराष्ट्राची सज्ञा कोकाटे या स्पर्धेची सर्वोत्तम महिला सायकलपटू ठरली.


या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे चेअरमन श्री ओंकार सिंग यांच्या अध्यक्षतेखाली राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष माननीय श्री सी. पी. जोशी यांच्या हस्ते संपन्न झाला, याप्रसंगी सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव मनिंदर पाल सिंग, खजिनदार प्रताप जाधव डायरेक्टर व्ही. एन. सिंग हजर होते.


Cycling Association of Maharashtra (CAM) is a pioneer in the promotion of cycling sports in Maharashtra affiliated to the Maharashtra Olympic Association (MOA) , Cycling Federation of India. #cycling #cam #cyclingassociationofmaharashtra #roadcycling #mtbcycling #trackcycling #cyclingmaharashtra #teammaharashtra



1 Comment


Chandrakant Sadanand Shinde
Chandrakant Sadanand Shinde
Dec 30, 2021

Congratulations to the entire team of Maharashtra.......

Like
bottom of page